दुसऱ्याचा वेश धारण करून फसवणूक करणे
संकेत माळीच्या घरी परवा वसुली पथक आले. वसुली कोणत्याही कर्जाची नव्हती तर मोबाईलच्या बिलाची होती. बिलाची रक्कम होती रुपये ५२,०००/- फक्त. संकेत गोंधळून गेला. त्याने तो मोबाईल नंबर मागितला. मोबाईल नंबर त्याचा नव्हता. व तो मोबाईल नंबर सतत बंदच लागत होता. त्याने तसेच त्या वसुली पथकाला सांगितले परंतु काही उप्तोग होत नव्हता. शेवटी प्रकरण पोलिसांकडे गेले. केवळ शहानिशा करणेसाठी पोलिसांनी विचारले की कशावरून हा मोबाईल नंबर संकेताचाच आहे? मोबाईल कंपनीने लगेचच सीम कार्ड घेताना दाखल केलेल्या कागद पात्रांची एक प्रत हजर केली. ( बर्याच मोबिल कंपन्या सीम कार्डचा फॉर्म व सोबत जोडलेली कागदपत्रे स्कॅन करून संगणकावर घेवून ठेवतात. ) सदर फॉर्म वर संकेतचा फोटो होता. सही होती. फोटो बाबत संकेत काही बोलू शकत नव्हता मात्र सही त्याने केलेली नाही हे मात्र तो ठाम पाने सांगत होता. त्या फॉर्म बरोबर संकेत च्या ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत सुद्धा जोडलेली होती. संकेत चक्रावलाच. संकेतच्या म्हणण्या नुसार त्याचे पाकीट आठ महिन्या पूर्वीच हरविले होते. पाकिटात फक्त त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स आणि १५० रुपये होते म्हणून त्याने पोलीस तक्रार देखी केली नव्हती. प्रकरण आता अंगाशी येत होते. संकेत ने पोलीस तक्रार दिलेली नव्हती मात्र पाकीट हरविल्या लगेचच पुढच्या आठवड्यात त्याने दुप्लीकेत लायसन्स काढले होते. मात्र याचा विशेष उपयोग होत नव्हता. लायसन्सचे गृहीत धरले तरी फोटोचा प्रश्न होताच.
संकेत व त्याच्या घरच्यांनी थोडा त्रास झाला तरी बाजू लावून धरली. सीम कार्ड कोठल्या विक्रेत्या कडून घेतले होते, त्यावरून कोणाकोणाला फोन केले गेले याचा तपशील मागविला. त्या सीम कार्ड वरून पुणे, मुंबई, उत्तर प्रदेश, दुबई येथे सर्रास फोन केले गेले होते. त्या नंबर वर फोन करून पोलिसांनी संकेत मालीची माहिती विचारली. त्यातील अनेकांनी संकेत माळी नावाच्या कोणत्याही इसमास ओळखत नसलेचे सांगितले. आता पोलिसांचा संकेत वर थोडा थोडा विश्वास बसायला लागला. व्यवस्थित निरीक्षण केलेवर असे लक्षात आले कि, सीम कार्ड वरील व लायसन्स वरील फोटो सारखाच आहे. अधिक तपास केलेवर आढळले कि सदर सीम कार्ड एका असिफ नावाच्या माणसाने वापरले होते. ह्या असिफ ला संकेत चे पाकीट सापडले होते किंवा त्याने चोरले होते. त्याने संकेतचे लायसन्स स्कॅन करून संगणकावर घेतले. त्यातील फोटो वेगळा करून त्याची कलर प्रिंट आउट घेतली. आता असिफ कडे संकेतचा फोटो होता आणि आयदेन्तिती व पत्त्याचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन्स होतेच. त्याबरोबर संकेत माळी ह्या व्यक्तीची सगळी माहिती मिळाली, लायसन्सवर नमुन्यासाठी संकेतची सही देखील होती. हे घेवून ह्या असिफने मोबाईलचे प्रीपेड कार्ड घेतले. नंतर ते दुसऱ्या कंपनीच्या पोस्ट पेड कनेक्शन मध्ये स्वीच ओव्हर केले. यामुळे पत्ता पडताळणी वाचली. दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही सर्व मोबाईल कंपन्यांची पत्ता पडताळणी ची व्यवस्था निदोर्ष नाही. असिफला मात्र यासाठी विशेष कष्ट पडले नाहीत. पूर्वी चोराने पाकिटातून १५० रुपये घेवून पाकीट फेकून दिले असते पण आता चोर देखील संगणक साक्षर व हुशार झालेले आहेत. सरते शेवटी संकेत च्या मागे लागलेली कटकट बंद झाली पण असिफ मात्र अजूनही सापडलेला नाही.
आपण आपली कागदपत्रे व्यवस्थित ठेवत नाही हेक खरे. व्यक्तीचे फोटोचा, पत्त्याचा नेमका पुरावा काय ? याबाबत अजूनही दुर्दैवाने आपल्याकडे ठोस कायदा नाही. आपल्याला येणारे विजेचे, फोनचे बिल हे पत्त्याच पुरावा म्हणून वापरता येते. मात्र विजेचे बिल पाकिटातून येत नाही. बी.एस.एन.एल.चे फोन चे बिल पाकिटातून येते पण ते पाकीट बर्याचदा बंद/सील केलेले नसते. याशिवाय काही वेळा पोस्टमन दादांकडून ते खूप वेळा इमारतीच्या खालील लेटर बॉक्स मध्ये नीट टाकले जात नाही. एखाद्या माणसाचे बिजेचे, टेलिफोनचे बिलाची झेरोक्स मिळविणे बिलकुल अवघड नाही. दुसऱ्याचे नाव पत्ता वापरून, दुसऱ्याचा वेश धारण करून सामोराच्यची फसवणूक करणेचे, नुकसान पोहाचाविनेचे, बदनामी करणेचे प्रकार आजकाल संगणक, मोबाईल, इंटरनेट, इ-मेल, नेत बँकिंग, सोशल नेत वर्किंग यामु;इ वाढत चालले आहेत.
कोथरूड मधील एका शाळेच्या काही विद्यार्थांनी त्यांच्याच एका शिक्षकाचे नावाने फेस बुक खाते उघडले. मोबिलेवरून सरांचाच फोटो काढून त्यांची प्रोफाईल तयार केली. व त्याच प्रोफाईल वरून त्यांच्याच शाळेत शिकविणाऱ्या एका शिक्षिकेला लग्नाची मागणी घातली. ... हळू हळू प्रकार अश्लीलतेकडे झुकू लागला. पुण्याच्या पोलिसांनी संगणक तज्ञांची मदत घेवून त्या विद्यार्थ्यांना लागलीच ओळखले व पकडले. नंतर विध्यार्थ्यांचे वय व त्यांच्या पालकांनी केलेल्या विनंती वरून शिक्षकांनी मोठ्या मनाने केस मागे घेतली व त्यांना माफ केले. आज काळ फेसबुक प्रचंड लोकप्रिय झालेले आहे. फेसबुक वर मोठे कलाकार, राजकीय व्यक्तींच्या नावाने नकली प्रोफाईल करणे हा आता पोलिसांसाठी एक डोके खाणारा विषय झाला आहे. फेसबुक प्रमाणेच पूर्वी ऑरकुट प्रसिद्ध होते. २००५ मध्ये टिळक रोड वरील एका शाळेतील दहावीच्या विध्यार्थ्यांमध्ये किरकोळ भांडण झाले. काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या मुलाची अशाच प्रकारे ऑरकुट वर नकली प्रोफाईल तयार करून त्याच्याच नावाने त्याच मुलाच्या मोठ्या बहिणीला लग्नाची मागणी घातली. ह्याही प्रकारात मुलांचे वय पाहून तडजोड करणेत आली. वयात येणाऱ्या, समज येत असलेल्या वयात ह्या प्रकारचे गुन्हे जास्त घडताना दिसतात.
एकदा अजिंक्य लोटे यांच्या इ-मेल वरून त्यांच्या अनेक मित्रांना एक इ-मेल आला कि ते आफ्रिकेत अडकले आहेत. त्यांची पैशाची पिशवीच कारमधून हरविली आहे. आता त्यांचे कडे हॉटेलचे बिल देवून परतायला देखील पैसे नाहीत. तेव्हा मदती साठी मानिग्राम व वेस्टन युनिअन च्या ह्या ह्या खात्यातून त्यांना ताबडतोब अर्ध्या तासात दोन हजार डॉलर्स पाठवावेत. अजिंक्य लोटे यांचे मित्र प्रकाशने हा मेल वाचताच मदतीचा हात पुढे केला व सहजच म्हणून अजिंक्याच्या मोबाईल वर फोन केला. तर अजिंक्य लोटे हे भारतातच, मुमाबी येथे होते. नंतर कळले कि त्यांचे इ-मेल खात्यावर कब्जा मी;वून आरोपी त्यांचे इ-मेल खाते वापरत होता. स्वतःच अजिंक्य लोटे असलेचा आभास निर्माण करीत होता.
आर्थिक व फौजदारी प्रकारच्या ह्या गुन्ह्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या कायद्याहे कलम ६६ सी तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ४१९ व इतर कलमांनुसार शिक्षा होवू शकते. हे दोन्ही गुन्हे जामिनास पत्र आहेत तसेच यासाठी पैश्याच्या स्वरूपात नुकसान भरपाई मागणेसाठी स्पेशल कोर्ट आहेच.
published in Kesari, marathi daily on 24/11/2011